ऑल इंडिया पँथर सेना इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी तुषार भारत भोसले

12

इंदापूर, दि.१८ ऑगस्ट २०२०: ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजय गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजा सरोदे तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष शरद गायकवाड व पुणे जिल्हा अध्यक्ष महेश शिवशरण यानी इंदापूर तालुक्यातील न्हावी येथील युवक तुषार भारत भोसले यांची दि.१७ रोजी नियुक्ती केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ऑल इंडिया पँथर सेना मोठ्या झपाट्याने वाढत आहे. तरुण मोठ्या संख्येने संघटनेत सामील होत आहेत. दलित अत्याचार, दलित बेरोजगारी, कामगार, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्याचा अजेंडा संघटना घेऊन निघाली आहे. संविधान, आरक्षण, लोकशाही वाचवण्याचा लढा तीव्र करत आहे. पुन्हा पँथरचा झंझावात उभा राहत आहे. संघटनेत रोज शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या लढाऊवृत्तीला मोठे पाठबळ मिळत आहे.

संघटनेत आलेल्या सर्वांचे ऑल इंडिया पँथर सेना पुणे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी स्वागत करत असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देत आहे. यावेळी आपण संघटनेचे काम तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे तुषार भोसले यांनी न्यूज अनकटशी बोलताना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- निखिल कणसे