पुणे, दि. १६ ऑगस्ट २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लाख करोड रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. यामध्ये शेतकरी, छोटे लघु उद्योजक यांना याचा फायदा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र याचा फायदा कोणाला झाला याबाबत विचारणा करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जाब विचारात आहेत. यासाठी त्यांनी शहरातील भाजप कार्यालयात तसे निवेदन दिले आहे.
बारामती शहरातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कॅनॉल रोड वरील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथे ‘कहा गये वीस लक्ष करोडो रुपये’ ऐवढया मोठे पॅकेज चे पैसे गेले कुठे त्याचा हिशोब विचारण्यासाठी भाजप कार्यालयात निवेदन दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव दादासाहेब काळे व पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस वीर धवल गाडे, बारामती युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव बुरुंगले, उपाध्यक्ष सुशांत सोनवणे, सुरज भोसले, बारामती काँग्रेस शहराध्यक्ष अशोक भाऊ इंगुले, शंतनु माळशिकारे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव