कदमवाकवस्ती येथील तेवीस वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह

5

कदमवाकवस्ती, दि. ११ जून २०२०: हडपसर येथील खासगी नामांकित कंपनीत कामाला असणाऱ्या कदमवाकवस्ती(ता.हवेली)येथील पठारे वस्तीमधील तेवीस वर्षीय युवक आज गुरुवारी (दि.११) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यास हडपसर येथील नोबल हॉस्पीटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर त्याच्या संपर्कात आलेल्या तीन जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असुन, वरील तीनही जणांना होम कॉरंटांईन करण्यात आल्याची माहित, लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी दिली आहे.

गेल्या दोन महिन्यातील कदमवाकवस्ती हद्दीतील हा आठवा कोरोनाबाधित आहे. पंधरा दिवसांपूर्वी कदमवाकवस्ती हद्दीतील कवडी माळवाडी परिसरातील कोरोनाबाधित कामगार व पठारे वस्तीत आज मिळालेला कोरोनाबाधित युवक असे दोघेही हडपसर येथील एकाच खासगी नामांकित कंपनीत कामाला आहेत. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मागील दोन महिन्याच्या कालावधीत कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले होते. यातील एकाचा मृत्यु झाला होता. तर सहाजण उपचार घेऊन घरी परतले आहे. मागील आठवडाभरापासुन कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरातील नागरिक कोरोना फ्रि झाले होते. मात्र पठारे वस्तीमधील वरील तरुणाचा कोरोना रिपोर्ट गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास पॉझिटीव्ह आल्याने, नागरीकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. डि. जे. जाधव म्हणाले, हडपसर परीसरातील एका नामांकित कंपनीमधील एक तेवीस वर्षीय कामगारास बुधवारी कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने, संबधित कामगारास नोबल हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. नोबल रुग्णालय प्रशासनाने केलेला स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान वरील तरुणाच्या संपर्कात आलेल्या तीनही जणांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी पाठवले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा