ट्वीटरचा ‘एडिट’ ऑप्शन होणार बंद

नवी दिल्ली : ट्वीटरवर युजर्सला ट्वीट करताना ‘एडिट’ करण्याचा ऑप्शन देण्यात येणार असल्याचे ट्वीटरच्या सीईओ जॅक डॉर्सी यांनी मागील वर्षात सांगितले होते.
मात्र आता पुन्हा ट्वीटरकडून सांगण्यात आले की, युजर्सला ‘एडिट’ ऑप्शन दिले जाणार नाही. त्याबाबतचा खुलासाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
ट्वीटरची मूळ डिझाइन आणि ओळख कायम राहावी म्हणून एडिट ऑप्शन न देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.

यावेळी डॉर्सी म्हणाले, काही युजर्स त्यांच्या ट्वीटरला अधिक लाईक्स मिळाल्यानंतर ते एडिट करुन खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच या सर्व गोष्टी लक्षात घेता एडिट ऑप्शन आम्ही युजर्सला यापुढे देणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा