ट्विटर पेड सब्सक्रिप्शन सर्विस भारतात लाॅन्च; ब्लू टिकसाठी दरमहा मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी २०२३ :मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने अखेर भारतातही आता सब्सक्रिप्शन सेवा सुरू केली आहे. भारतात मोबाइल युझर्सना ‘ट्विटर ब्लू’ साठी दरमहा ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर कंपनीने ६५० रुपयांचा सर्वात कमी किंमतीचा प्रीमियर सब्सक्रिप्शन प्लॅन दिला आहे. हा प्लॅन वेब युझर्ससाठी असणार आहे.

  • पहिल्यांदा ‘या’ शहरात सर्विस लाॅन्च

दरम्यान, इलॉन मस्कने गेल्या वर्षी ४४ बिलियन डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केले. त्यानंतर मस्कने ट्विटरमध्ये अनेक बदल केले. यातच ट्विटर ब्लू सेवेची घोषणा करण्यात आली होती. ट्विटरने याआधी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह इतर काही देशांमध्ये ट्विटर ब्लू सेवेची सुरुवात केली होती. या देशांमध्ये ट्विटर ब्लू सेवेसाठी ८ डॉलर प्रतिमहिना शुल्क आकारले जात आहे. वर्षभराचे सब्सक्रिप्शन घेतल्यास ८४ डॉलर खर्च करावे लागत आहेत. ट्विटर ३ डॉलर अतिरिक्त चार्ज आकारुन गुगलला कमीशन देणार आहे.

आता भारतातही या सेवेची सुरुवात झाली आहे. ट्विटर ब्लू सेवा घेण्यासाठी वेब युझर्सना दरमहा ६५० रुपये तर मोबाइल यूझर्सना दरमहा ९०० रुपये चार्ज केले जाणार आहेत. तर वर्षभराचे सब्सक्रिप्शन घेतले तर ६८०० रुपये भरावे लागणार आहेत.

  • ट्विटर ब्लू यूझर्सना मिळणार ‘या’ सुविधा

ट्विटर ब्लू सब्सक्रिप्सनसोबत यूझर्सना ब्लू टीकमार्क दिला जाणार आहे. यासोबतच यूझर्सना एडिट ट्विट बटन, १०८० p व्हिडिओ अपलोड करण्याच्या सुविधेसोबतच रीडर मोडचाही ॲक्सेस मिळणार आहे. याशिवाय ट्विटर यूझर्सना नॉन पेड यूझर्सच्या तुलनेत कमी जाहिराती दिसतील. तसेच वेरिफाइड यूझर्सना ट्विटला रिप्लाय आणि ट्विटमध्येही प्राधान्य दिले जाईल. या अंतर्गत यूझर्सना ट्विटसाठी ४ हजार – अक्षरांची मर्यादा देखील मिळणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा