पुणे; याआधी भारत सरकारने भारतातील सोशल मीडिया एप्स काही नियम लाभ देण्याचे ठरवले होते आणि आता ट्विटर च्या सी ई ओ जॅक दुरसे यांनी ट्विटर वरील राजकीय जाहिरातींवर बंदी आणली आहे.
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, राजकीय जाहिरातीमुळे औद्योगिक जाहिरातींवर विपरित परिणाम होत आहे. राजगिरी जाहिराती या व्यापक असल्याने जागतिक स्तरावरील औद्योगिक जाहिरातींना याचा फटका बसत आहे. कंपनी १५ नोव्हेंबरपर्यंत नियम जाहीर करणार आहे त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून हे नवीन नियम युजर्ससाठी लागू होणार आहेत.
राजकीय जाहिरातबाजी ही सर्वाधिक फेसबुक, ट्वीटर व गुगलवर अधिक प्लॅटफॉर्मवर केली जाते. आता राजकीय जाहीरातीसाठी काही नियमांची गरज असल्याचे डोरसे यांनी सांगितले. सध्या राजकीय जाहिरातींच्या मुद्द्यांना सामोरे जाण्यासाठीही भारत संघर्ष करीत आहे. सरकारने याबाबत सोशल मीडिया कंपन्यांसाठी नियम करण्यास सांगितले आहे. तर डोरसे यांच्या ट्विटला भरपूर पाठिंबा मिळाला आहे.