श्रीगोंदा, दि. ३० जून २०२०: श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव येथे दिनांक २९जून रोजी राष्ट्रीय पक्षी मोर यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी वन विभागाच्या अधिका-यांनी दोघांना अटक केली आहे. अशी माहिती वन विभागाचे अधिकारी नातू यांनी दिली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव आणि आसपासचा परिसर हा वन विभागाच्या मालकीचा आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोर, काळवीट, हरिण, काही वन्यजीव राहत आहेत. परिसरातील लोकांना त्यांचे दर्शन हे सतत होत असते. सध्या पावसळा असल्याने प्राणी पक्षी यांचे प्रमाण हे पावसामुळे जास्त प्रमाणात पाहण्यास मिळत आहेत.
याच परिसरामध्ये मोर आणि काळवीट यांची हत्या होत असल्याची माहिती वन विभागाच्या गुप्त माहिती दाराकडून वन अधिकारी नातू यांना मिळाली. या नंतर त्यांनी आज घटनास्थळी भेट दिली. या भेटी दरम्यान दोन ठिकाणी त्यांनी छाप्पे मारले या वेळी त्यांना मारलेल्या मोराचे अवशेष आणि काळवीटाची कातडी मिळून आली. या नंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वन विभागाचे अधिकारी नातू यांनी दिली आहे. या प्रकरणी मोठी कारवाई करून दोघांना शिक्षा देण्याची मागणी वन्य जीव प्राणी, मित्र निसर्ग, मित्र यांनी केली आहे. देऊळगाव परिसरात मोर मारल्या प्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष