जम्मूमध्ये दोन बॉम्बस्फोट; सहा जण जखमी

जम्मू , २१ जानेवारी २०२३ : जम्मूमधील नरवाल परिसरात शनिवारी सकाळी लगोपाठ दोन भीषण स्फोट झाले. या घटनेत सहा जण जखमी झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याता आले आहे. राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ जम्मूमध्ये दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, जम्मूच्या नरवाल भागात झालेल्या दोन स्फोटात सह जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरवाल भागातील ट्रान्सपोर्ट नगरच्या सात आणि नऊ क्रमांकाच्या यार्डमध्ये हा स्फोट झाला आहे. या घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून पुढील तपास करत आहेत.

सोहेल कुमार, (वय ३५), सुशील कुमार, (वय २६ ), विशाप प्रताप, (वय २५), विनोद कुमार, (वय ५२), अरुण कुमार, (वय २५), अमित कुमार, (वय ४०) आणि राजेश कुमार, (वय ३५) अशी जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा