वृद्ध व्यक्तीला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याबद्दल दोन पोलिसांना निलंबित…….

जेव्हा कायद्याचे रक्षकच जर आत्याचार करू लागले. तर मग अत्याचार झाल्यावर सामान्य जनतेनं जायचं तरी कुठे? हा प्रश्न ऐरणीवर आला आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ज्यामधे कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसले.

ज्येष्ठांकडून फसवणूक आणि खंडणीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या दोन कर्मचार्‍यांना काल निलंबित करण्यात आले. रविवारी सायंकाळी नरेला पोलिस स्टेशनचे प्रभारी आणि सहायक उपनिरीक्षक यांना निलंबित करून जिल्हा पोलिस लाइनमध्ये पाठविण्यात आले.

एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले की, वरिष्ठ नागरिकांनी या प्रकरणात हबियास कॉर्पस याचिका दाखल केली असून त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ते म्हणाले की पोलिस कर्मचार्यांवरील आरोपांची चौकशी केली जात आहे.

आरोपांची चौकशी जरी होत असली. तरी या घटनेमुळे वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचा सुरक्षितेचा प्रश्न तसाच सतावत आहे. ज्यावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा