ठाण्यात बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळल्याने दोघांचा मृत्यू

ठाणे, २४ फेब्रुवारी २०२३ : ठाण्यातील नौपाडा परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु असताना ढिगारा कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हबीब आणि रणजित अशी मृत कामागारांची नावे असून निर्मल कुमार गंभीर जखमी आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहायक आयुक्त (नौपाडा प्रभाग समिती) यांच्यासह मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचावकार्य सुरू केले.

काही वेळातच ढिगारा बाजूला केल्यावर त्याखाली अडकलेल्या दोन जणांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर एक कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा