जालन्यात दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक

जालना ५ ऑगस्ट २०२४ : जालन्यात दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात घडलाय. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जालना शहरातून मंठा चौफुली कडे जाणाऱ्या मंठा बायपास जवळ हा अपघात घडलाय.

शहरातील रहिवासी दिलीप पोहनेरकर हे त्यांच्या चारचाकी वाहनाने जालना शहरातील अंबड चौफुलीकडून बायपास रोडने मंठा चौफुलीकडे जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने समोरून आलेल्या बोलेरो जीपने कारला समोरून धडक दिली. या अपघातात पोहनेरकर यांच्या कारचा समोरच्या भागाचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर बोलरोचे समोरचे चाक निखळले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून पोहेनेरकर यांना कोणतीही ईजा झाली नसल्याने ते सुखरूप आहेत. तर त्यांच्या सोबत असलेले मित्र किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा