सुलतानपूरमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक; ६ डबे रुळावरून घसरले

सुलतानपूर, १६ फेब्रुवारी २०२३ :उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जंक्शनजवळ एका अपघात झाला असल्याची बातमी समोर येत आहे. गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मालगाडीचा चालक जखमी झाला. तर ६ डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातामुळे लखनौ-वाराणसी मार्ग विस्कळीत झाला .

मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानपूर जंक्शनच्या दक्षिणेकडील केबिनजवळ एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या आल्याने हा अपघात झाला. त्यामुळे मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, वाराणसीकडील आरी मालगाडीचा चालक जखमी झाला असून, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी वाहतुक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच, नेमका हा अपघात कशामुळे झाला, याचा तपास करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा