उत्तर प्रदेश, दि. २९ जून २०२०: उत्तर प्रदेशच्या बांदा आणि चित्रकूटमध्ये दोन मुलींवर बलात्काराची घटना घडल्या आहेत. तर पुढील तपास हे तेथील पोलिस करत आहेत. पोलिसांनीच दिलेल्या माहती नुसार बांदामध्ये ९ वर्षाच्या मुलीला तिच्या काकांनी शनिवारी रात्री घरातून झोपेत असता तिला पळवून नेले, असे सांगितले.
तिरुवारी पोलिस स्टेशनचे एसएचओ राम दिनेश तिवारी यांनी सांगितले की त्याने तिला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी चंदू असे पोलिसांना मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अटक केली होती. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल देखील केला आहे. मुलीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे व तिची प्रकृती स्थिर असल्याचे एसएचओने सांगितले.
अशीच आणखी एक नात्याला काळीमा फासवणारी घटना चित्रकूट येथे घडली आहे. आजीच्या घरी लग्नासाठी गेलेल्या १० वर्षांच्या मुलीवर तिच्या काकांनीच बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
भारतकोप पोलिस स्टेशनचे एसएचओ संजय उपाध्याय यांनी ही घटना २० जून रोजी घडल्याचे सांगितले. २४ जून रोजी मुलीने तिच्या कुटुंबातील सदस्यांकडे कल्पित वक्तव्य केले आणि त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. २७ जून रोजी याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला असे त्यांनी सांगितले. रविवारी पोलिसांनी गोरेलाल या आरोपीला अटक केली आणि मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी