उदगीर, लातूर ८ मार्च २०२४ : उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे दोन गटात प्लॉटच्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ६ मार्च रोज बुधवारी घडली आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी १९ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवर्जन येथे दोन गटाचा प्लॉटचा वाद न्यायालयात चालू असून या प्लॉटच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांना मारहाण करण्यात आली काठीने व लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ करून एकमेकांस जीवे मारण्याची धमकी दिली. तुकाराम दिगंबर खटके यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पुंडलिक रघुनाथ खटके यांच्यासह नऊ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुंडलिक रघुनाथ खटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम खटके यांच्यासह १० लोकांवर गुन्हा दाखल झालाय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते हे करीत असल्याची माहिती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक