राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे गावच्या हद्दीत भीषण अपघात, दोन ठार तर चारजण जखमी

सातारा, ०३ ऑगस्ट २०२२: साताऱ्यात नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील चौकात पहाटे सहाच्या सुमारास भीषण अपघात झालाय. वॅगनार गाडीने थांबलेल्या ट्रकला मागून जोरात धडक दील्यानं अपघात झाला. या अपघातात नाना साळुंखे आणि लक्ष्मी साळुंखे या जोडप्याचा मृत्यु झाला असून मुलगी माधूरी साळुंखेसह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

जखीमींना उपचारासाठी रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे. साळुंखे कुटुंबीय मुंबईहून आपल्या ढेबेवाडी या गावी जात असताना या कुटुंबावर काळानं घात केला. नागठाणे चौकात आणि रस्त्याच्या कडेला वाहणं लावली जातात त्यामुळं या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.

या अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. या अपघातात जखमी वर रुग्णालयात उपचार सूरु आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा