मेरठ सरधना मध्ये भीषण स्फोट, अनेक घरांची छप्पर सपाट, दोन जणांचा मृत्यू

सरधना (उत्तर प्रदेश), २९ ऑक्टोबर २०२०: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. सरधना येथील पीर जादगान भागात आज सकाळी एक भयानक स्फोट झाल्यानंतर नागरिकांमध्ये पळापळ सुरू झाली. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर या स्फोटांमध्ये अनेक जण जखमी झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. ज्या घरामध्ये हा भीषण स्फोट झाला त्या घरामध्ये फटाके ठेवण्यात आले होते असं सांगण्यात येत आहे.

स्फोटाची तीव्रता भीषण होती, पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आलं. पोलिसांनी परिसर सील करून या अपघाताचा तपास सुरू केला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास एका पक्षाचे माजी शहराध्यक्ष असीम यांच्या घरी हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटात आजूबाजूच्या घरांची छत उडून गेली.

अपघातात असीमचा जागीच मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे, तर कासिमचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. याशिवाय अनेक शेजारी गंभीर जखमी झाले आहेत. घरात मोठ्या प्रमाणावर फटाके ठेवले गेले होते, त्यामुळं या फटाक्यांमधील दारुमुळं हा मोठा स्फोट घडून आला आहे.

या फटाक्यातील दारू बरोबरच घरात असलेल्या गॅस सिलेंडरला देखील आग लागली. त्यामुळं सिलेंडरचा देखील या आगीत स्फोट झाला. एकूण या दोन्ही गोष्टींमुळे हा स्फोट तीव्र क्षमतेचा होता. त्यामुळं आजूबाजूच्या घरांच्या भिंतींना देखील भेगा पडल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा