इंदापूर, ११ ऑगस्ट २०२०: दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जणाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावच्या हद्दीत घडली.
याबाबत अधिक वृत्त असे की, हिरो होंडा कंपनीची स्पेल्डर मोटारसायकल (नं एम. एच १२ डी एक्स ९६६८) व लुना गाडी (नं एम एच ४२ एपी १७३१) यांचा सोलापूर पुणे हायवे महामार्गावर अपघात झाला.या अपघातात लुना मोटारसायकलवरील इसम अर्जुन हरिबा शिंदे (वय ५५ वर्षे रा.पोंधवडी ता.इंदापूर जि.पुणे) हे जबर मार लागल्याने जागीच मयत झाले.
तर त्यांच्या बरोबर असलेले दुसरा इसम अनिल धोंडिबा खारतोडे (वय -५० वर्षे रा.पोंधवडी ता.इंदापूर ) व हिरो होंडा स्पेंल्डर मोटारसायकल वरील आयुब इसाक पटेल (वय ४२ वर्षे ), युसूफ रुस्तुम पटेल (दोन्ही रा.औंसा जि लातूर ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी भिगवण येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे