गोल पोस्ट राष्ट्रीय उत्तर प्रदेशात वीज कोसळल्याने दोन ठार, सहा जखमी

उत्तर प्रदेशात वीज कोसळल्याने दोन ठार, सहा जखमी

बलिया, दि. ३ जुलै २०२०: उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात वीज कोसळून दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. गुरुवारी नरही भागातील कोठिया सेंदुरिया गावात वीज कोसळल्यामुळे निशात (१८) आणि बागडेन (६०) ठार झाले. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

गुरुवारी गडवार भागातील हरिहरपूर गावात वीज कोसळल्याने तीन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version