जळगावात उपासमारीने दोन स्थलांतरित मजूरांचा मृत्यू

जळगाव, दि. १५ मे २०२०: लॉकडाऊनमुळे मजूरांना आपल्या घरी पायी जाण्याची वेळ आली आहे. आपल्याला जरी त्यांचा हा प्रवास घरी जाण्याचा दिसत असला तरीही प्रत्यक्षात काही वेळा हा प्रवास त्यांच्यासाठी मृत्यूचा देखील ठरत आहे. नुकतेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उपासमारीने किंवा भुकेने कोणत्याही मजूरांचा मृत्यू होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र गोयल यांच्या आश्वासनाच्या काही तासातच जळगावात उपासमारीमुळे दोन स्थलांतरित मजूरांचा मृत्यू झाला आहे.

या आणि यासारख्या अनेक घटना आत्तापर्यंत या स्थलांतरित मजूरांसोबत घडल्या आहेत. या घटनांमधून लॉकडाऊनचे भयाण वास्तव समोर येत आहे. या भयाण वास्तवाचे एक उदाहरण म्हणजे मुंबईतून उत्तर प्रदेशाकडे चालत निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. तर एका मजुराने नदीत उडी मारून आत्महत्या केली. जळगावातील मुक्ताईनगरजवळ ही धक्कादायक घटना घडली. उपाशीपोटी चालून थकलेल्या या मजुरांचा धीर सुटला आणि त्यांचा भुकेने बळी घेतला.

हे मजूर अनेक दिवसांपासून पायी घरी परतत आहेत. वाटेत मिळेल ते खायचं, काही मिळालं नाही तरी तसंच चालायचं, असं करत करत हे मजूर जळगावपर्यंत पोहोचले होते. मात्र त्यांची वाट भुकेने रोखली आणि तिथेच ते हरले. मुंबईवरुन उत्तर प्रदेशच्या दिशेने असंख्य मजूर वाट काढत आहेत. मिळेल त्या वाहनाने प्रसंगी चालत हे मजूर गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगावपर्यंत उपाशीपोटी चालत गेलेले हे मजूर इतके थकले की त्यांचा यामुळे मृत्यू झाला. तर एका मजुराने थेट नदी उडी घेऊन आत्महत्या केली. या मजूराने उपासमारीला कंटाळून पुलावरुन उडी मारून नदीच्या पात्रात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा