सांगली, २० ऑक्टोबर २०२२: सांगली जिल्ह्यातील पलूस येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात लांचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. एका कंपनीच्या अधिकारी सोलर इन्स्टॉलेशनची फाईल मंजुर करण्यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतूल श्रीरंग पेठकर यांना ४५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता सागर विलास चव्हाण यालाही अटक करण्यात आली. दोन्ही अभियंतांवर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची माहिती पोलीसांनी अशी सांगितली आहे की, पलूस येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात सोलर इन्स्टॉलेशनची फाईल सादर केली होती.
ती फाईल मंजुर करण्यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतूल पेठकर व सहाय्यक अभियंता सागर चव्हाण यांनी त्या माणसांना ४५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत संबंधिताने सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर संबंधिताला पैसे घेऊन पेठकर व चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आले. पेठकर यांने तक्रारदाराला लाचेची मागणी करुन ४५ हजार रुपये स्वीकारल्याचे आढळून आले. या प्रकरणी सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पलूस पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर