दोन काय वीस कोटी दिले तरी खेळणार नाही : हरभजन सिंग

नवी दिल्ली, दि. ६ सप्टेंबर २०२०: भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आयपीएल स्पर्धेतून घेतलेल्या माघारीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतला असून या स्पर्धेच्या करारानुसार दोन कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, दोन काय वीस कोटी रुपये दिले तरीही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे ठाम मत हरभजन सिंगने या वेळी व्यक्‍त केले आहे.

मी यावर्षी काही वैयक्‍तिक कारणांमुळे आयपीएल खेळणार नाही. हा कठीण काळ आहे आणि मला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे असे हरभजन सिंग याने सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: