बीड जिल्ह्यात दोन बहिणीसह भावाचाही मृत्यू

बीड, दि.९ जून २०२० : कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या बहिणींना पाण्यात उतरलेला लहानभाऊ पाण्यात बुडत असल्याचे दिसले. त्या भावाला वाचविताना त्यांचाही बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दाऊतपूर (ता.परळी) येथे सोमवारी सकाळी घडली.

परळीनजीकच्या दौतपूर परिसरात नांदेड जिल्ह्यातील व सरणी येथील दांडेकर कुटुंब दगड फोडण्याच्या कामानिमित्त आले होते. कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध म्हणून लॉकडाऊन सुरू झाल्याने ते इथेच अडकून पडले. सोमवार दि.८ जून रोजी सकाळी सात वाजता सुरेखा राजाराम दांडेकर (वय १५), रेखा राजाराम दांडेकर (वय १२) आणि रोहित नारायण दांडेकर (वय ११) हे चुलतभाऊ बहीण खदानीच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी उतरले होते.

रोहित खदानीत खेळताना बुडतो आहे हे पाहून सुरेखा व रेखा यांनी रोहितला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दोघींनाही पोहता येत नसल्याने ते बुडाले आणि दुर्दैवाने या खदानीत बुडून तिघांचा मृत्यू झाला. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीनही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

घटनास्थळाचा पंचनामा करून या तीन भावंडांचे मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यासंदर्भात परळी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा