श्रीनगर, दि. २५ जुलै २०२०: जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या सीमेवरील रणवीरगढ येथे सुरक्षा दला बरोबर झालेल्या अतिरेक्यांच्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले आहेत. या चकमकीत एक सैनिक देखील जखमी झाला आहे. चकमकीच्या वेळी एका सैनिकाच्या पायाला गोळी लागली होती, त्याला उपचारासाठी ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सैन्य दल, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि अन्य निमलष्करी दलाचे पथक संपूर्ण भागात शोध मोहिमेत गुंतले आहेत. या भागात दहशतवादी लपवल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दहशतवाद्यांनी केला गोळीबार
सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेराव घालून आत्मसमर्पण करण्यास सांगितले तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सैन्याने प्रतिहल्ला केला यात एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला. काही वेळातच सैन्याने आणखी एका दहशतवाद्याला ठार मारले.
श्रीनगरच्या सरहद्दीवर रणबीरगड (पंजिनारा) येथे अतिरेक्यांशी चकमकी घडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस पथकही या कारवाईत गुंतले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण भागात जोरदार गोळीबार ऐकू येत आहे.
सुरक्षा दलाने परिसर घेरला
सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून ते शोध मोहिमेत गुंतले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांचा शोध घेण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी