सिक्कीम १७ जून २०२३: मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे, सिक्कीम मधील चुंगथांग जवळील रस्ता वाहून गेला. त्यामुळे दोन हजारांहून अधिक पर्यटक उत्तर सिक्कीममध्ये अडकले आहेत. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बीआरओ प्रोजेक्ट स्वस्तिकने प्रभावित क्षेत्रामध्ये, तात्पुरती क्रॉसिंग बांधण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केलय.
पीआरओ महेंद्र रावत यांनी सांगितले की, आज दुपारी १२ वाजेपर्यंत ३०० हून अधिक पर्यटकांची सुखरुप सुटका झाली तसेच रस्ता पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यटकांचे रेस्क्यु सुरुच राहणार आहे असेही महेंद्र रावत यांनी सांगितले.
सिक्कीम पोलिसांनी सांगितले की, भूस्खलनामुळे बाधित झालेल्या दोन बसमधून आतापर्यंत एकूण ७२ पर्यटकांना वाचवण्यात यश आलय. गंगटोकसाठी जाणारी १९ पुरुष, १५ महिला आणि ४ मुले असलेली पहिली बस, मंगन जिल्ह्यातील पेगोंग येथे अडकली होती.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर