पार्किंगमधील दुचाकींना अज्ञाताने लावली आग

6

बारामती, दि.३०एप्रिल २०२०: शहरातली जामदार रोडवर असणाऱ्या देवराज निसर्ग या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या पाच दुचाकी गाड्यांना अज्ञात इसमाने आग लावल्याने दुचाकी जाळून खाक झाल्याने एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बारामती शहरातील जामदार रोडवरील देवराज निसर्ग या इमारतीच्या पार्किंग मधील दुचाकींना मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने पाच दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

या दुर्घटनेत एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातात झालेल्या दुचाकी एम एच-४२-ए जी ९५१९ ,एम एच- ४२ -ए जी ९१३६ , एम एच -१६ ए पी ५२९२ , एम एच ४२ सी ९०६७ , एम एच -४२- ए एन- १०३३ या दुचाकी आगीत भस्मसात झाल्या आहेत यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तेथील रहिवासी अस्लम रज्जाक तांबोळी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी आर.वाय.आटोळे करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा