रांजणगाव एमआयडीसीत मैलामिश्रित पाण्यात बुडून दोन कामगारांचा मृत्यू

पुणे, ५ नोव्हेंबर २०२२: शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीत असणाऱ्या फियाट कंपनीत मैलामिश्रित पाण्यात बुडून दोन कामगारांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मैलामिश्रित पाण्याची टाकी साफ करताना हा प्रकार घडलाय. या मैलामिश्रित पाण्यात मच्छिंद्र काळे व सुभाष उघडे या दोन कामगारांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळं एमआयडीसी परिसरात मोठी खळबळ उडालीय.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, तिघंजण मैलामिश्रित पाण्याची टाकी साफ करताना एकाचा तोल जाऊन टाकीच्या पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दोघांनी उडी मारली. या सर्व घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.

तर एक जण सुखरुप टाकीतून बाहेर आला असून त्याला पायाला व पाठीला लागलं असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटनास्थळी दाखल झालेले रांजणगाव पोलीस पुढील तपास करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: विजय सपकाळ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा