पालघर, १४ डिसेंबर २०२२ : वाडा तालुक्यातील बिलोशी येथील महिंद्रा रोझिन ॲंड टरपेंटाईन या कारखान्यात
रिॲक्टर टॅंक साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोघा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडल. सचिन भोईर व किशोर फरले अशी मृत कामगारांची नावे आहेत.
घटनास्थळावरूरन मिळालेल्या माहितीनुसार, सचिन व किशोर हे दोघे कामगार बिलोशी गावाच्या हद्दीत असलेल्या महिंद्रा रोझिन ॲंड टरपेंटाईन या कपंनीत अनेक वर्षांपासून काम करीत होते. या कपंनीत रंगात लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती केली जाते. या कपंनीत सुमारे २० ते २५ कामगार काम करतात.
आज सकाळी ९.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे सचिन टाकीत सफाईसाठी उतरला होता. मात्र, गुदमरू लागल्याचे लक्षात येताच त्याने आरडाओरड केली. यावेळी किशोर त्याला वाचविण्यासाठी टाकीमध्ये उतरला; मात्र तोही अत्यवस्थ झाला. यानंतर सुरक्षा वापरून अन्य कामगारांनी दोघांना बाहेर काढले. संपूर्ण घटनेमुळे वाडा येथील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर