छत्रपती संभाजीनगर, १२ एप्रिल २०२४ : पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकाचा विहीरीत बडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील भारती विद्यापीठ टेकडी नजीक घडली आहे.
वैभव मोरे ( वय २३, रा. मुळ सटाणा, जि. नाशिक) आणि सचिन काळे ( वय २८, रा. सातारा परिसर) असे या मयताचे नाव असून
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बी टेकच्या द्वितीय वर्षात शिकत असलेला वैभव हा सचिन व अन्य दोन मित्रासह सातारा भागातील भारती विद्यापीठ परिसरातील टेकडी जवळील एका विहीरीत पोहण्यास गेले होते. वैभवला पोहता येत नसल्याने पाण्यात उतरल्यावर काही वेळातच तो बुडाला. दरम्यान सचिन त्याला वाचवायला गेला असता तो सुद्धा पाण्यात बुडाला.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत दोघांना बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत असतानाच त्यांना दवाखान्यात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून सदर युवकांना मयत घोषित केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : संजय आहेर