पुणे : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला नव्हता. तसेच त्यांनी सध्या असणारे शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला ठाकरे यांनी पाठिंबा देण्याबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांची पक्षांतर्गत आणि राजकीय भूमिका काय आहे, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज ठाकरे आजपासून ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.
या दोन दिवसात ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
आज मनसेचे राज्यभरातील तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे शिबीर संपन्न होणार आहे.
तर उद्या डेक्कन जिमखाना येथे मनसेचे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडणार आहे. हे दोनही कार्यक्रम निमंत्रित कार्यकर्त्यांसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी राजकीय मुद्द्यांवर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. परंतु लवकरच याबाबत आपली भूमिका मांडू असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.