टाइप २ डायबिटीसचे नियंत्रण: समज व वास्‍तविकता, डायबिटीसचे निदान एकमार्गी होऊ शकते का ?

१४ नोव्हेंबर हा डायबेटिस दिवस म्हणून जगात साजरा केला जातो . या निमित्ताने पुणे येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीनचे कन्‍सल्‍टण्‍ट फिजिशियन व डायबिटीस स्‍पेशालिस्‍ट डॉ. विचार निगम यांनी डायबेटिस याविषयीचं मत व्यक्त केलं आहें
जगभरातील संशोधकांना आढळून आले आहे की, कुटुंबांमध्‍ये आनुवांशिकरित्‍या टाइप २ डायबिटीस आजार असण्‍याची शक्‍यता आहे. पण आपल्‍या देशामध्‍ये प्रत्‍येक नवीन निदान झालेल्‍या मधुमेही रूग्‍णाचा आजारासंदर्भात कौटुंबिक इतिहास नाही. यासाठी त्‍याची जीवनशैली कारणीभूत आहे, म्‍हणजेच आहाराच्‍या सवयी, बॉडी हॅबिटस, व्‍यायाम वेळापत्रक आणि तणाव व्‍यवस्‍थापन या संभाव्‍य घटकांचा त्‍याच्‍या अॅब्‍नॉर्मल शुगर मेटाबोलिझमवर परिणाम होत आहे.
खरी समस्‍या आपणा भारतीयांची वाढ व संगोपन करण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये आहे. ‘रोटी, कपडा और मकान’ आणि ‘दोन जूने की रोटी’ साध्‍य करण्‍यासाठी आपल्‍या देशातील आहारामध्‍ये उच्‍च कर्बोदकांचे प्रमाण असते. आपण होम डिलिव्‍हरी अॅप्‍स यासारख्‍या साधनांमुळे आपण मेहनत कमी करू लागलो आहोत आणि सुलभ परिवहन सुविधा देणा-या स्‍कूटर्समुळे बैठेकाम करण्‍याच्‍या जीवनशैलीमध्‍ये अधिक भर पडली आहे. परिणामत: आपल्‍या कर्बोदक सेवनाचे प्रमाण कमी झाले आहे. तरीदेखील आपण आपल्‍या पूर्वजांच्‍या आहार पद्धतीप्रमाणेच आहार सेवन करत आहोत. परिणामत: ग्‍लायसेमिकचे प्रमाण उच्‍च होऊन मधुमेहपूर्व स्थिती निर्माण होते (अधिक वेळ उपाशी राहणे किंवा जेवणाच्‍या २ तासांनंतर साखरेचे सेवन) आणि शेवटी टाइप २ डायबिटीस होण्‍याची शक्‍यता वाढते. म्‍हणूनच, आपण आहारतज्ञाच्‍या सल्‍ल्‍यानुसार रोजच्‍या आवश्‍यकतांनुसार आहार सेवन केले पाहिजे.
आपल्‍या आहारासंदर्भात एखादी समस्‍या असेल तर ती म्‍हणजे आपल्‍या खाण्‍याची पद्धत. म्‍हणून उपाय आपल्‍या आहारामध्‍येच आहे. होय, आहार व दैनंदिन नित्‍यक्रमामधील योग्‍य परिवर्तनांसह मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. तुम्‍ही मधुमेही रूग्‍ण असाल तर नियमितपणे फॉलो-अप्‍स घ्‍यावे, ज्‍यामध्‍ये कोणत्‍याही वैद्यकीय उपचाराची गरज भासत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिंधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा