उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या इशाऱ्यावरूनच हिंसाचार: अखिलेश यादव

उत्तर प्रदेश : नागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशात परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असल्याचे चित्र आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचारात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. याच मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगींच्या इशाऱ्यावरूनच हिंसाचार घडत असल्याचे यादव यांनी सांगितले.

यावेळी यादव म्हणाले की, जिथे मुख्यमंत्री स्वतः बदल्याची भाषा करत असतील तेथील पोलिसांकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या हिंसक आंदोलनाला पोलीस जबाबदार आहे.आणि त्यांच्याकडून जाणीवपूर्वक हे काम करून घेतले जात आहे.
भाजप सरकार अर्थव्यवस्था, रोजगार आणि शेतकर्‍यांच्या मुद्दय़ावर अपयशी ठरल्याने जनतेचे लक्ष वळवण्यासाठी दंगली घडवून आणत आहे. दंगलीचा फायदा भाजपाला होत असून दंगल करणारे सरकारमध्ये बसलेले आहेत.
भाजप जाणीवपूर्वक द्वेष आणि लोकांमध्ये भीती पसरवत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून ‘ठोक देंगे आणि बदला ले लो’ असे शब्द वापरले जात असल्याने परिस्थिती चिघळत आहे. यामुळे जगभरात देशाची प्रतिमा मालिन होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ७०६ जणांना हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा