उच्चदाब विद्युत वाहिनीच्या अनाधिकृत कामामुळे रहिवाशांना धोका

इंदापूर (प्रतिनिधी) दि.१२: इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी मधील एका खासगी जागेतून जाणाऱ्या महावितरण च्या उच्चदाब वाहिनीचे कासल्याही प्रकारे मान्यता न घेता परस्पर हलविण्यात आल्याने येथील स्थानिक रहिवाश्यांनी संताप व्यक्त करत आता महावितरण कडे तक्रार देणार असल्याचे सांगितले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी मधून महावितरण ची ३३ के. वि. ही उच्चदाब वहिनी गेली आहे. या ठिकाणी रहिवाशी वसाहत असून दुसऱ्या ठिकाणी बांधकामास अडथळा निर्माण करणाऱ्या या उच्चदाब वाहिनीची येथील स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता परस्पर कोणतेही कागदोपत्री परवानगी न घेता हलविण्यात आले.
त्यामुळे येथील रहिवाश्याना आता आपल्या इमारतीच्या अगदी जवळून गेलेल्या वाहिनीमुळे धोका निर्माण झाला आहे.

सदर उच्चदाब वहिनी हलवीत असताना त्या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांना कसल्याही प्रकारे न विचारता किंवा कोणत्याही प्रकारची कागदोपत्री प्रक्रिया न करता संबंधित लाईनमन आणि महावितरणचे सहायक अभियंता युवराज जाधव आणि लाईन स्टाफ आनंद एकाड यांनी परस्पर आर्थिक देवाण-घेवाण करून हे कृत्य केला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभाराविषयी वारंवार तक्रारी येत असतानादेखील वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे गंभीर यांनी दखल घेत नसल्याचे दिसत आहे.
सदर कामाविषयी आपण वरिष्ठ कार्यालाकायकडे लेखी तक्रार करणार असल्याचे स्थानिकांनि सांगितले आहे.

सहायक अभियंता यांचा अजब दावा:

आम्ही हे काम दुरुस्ती देखभाल अंतर्गत केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे परंतु त्या कामाचा कसलाही एम ओ किंवा अंदाजपत्रक आणि मान्यता घेतली नसल्याची माहिती समोर आले आहे.
तसेच एवढ्या मोठ्या उच्चदाब वाहिनीचे परस्पर काम करून त्यांनी आपण आपल्या कामात किती गंभीर आहे हे दाखवून दिले आहे.
फोटो ओळ – अनधिकृत पणे उच्चदाब वहिनी केलेलं काम त्यामुळे धोका निर्माण झालेली रहिवाशी इमारत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा