पुणे २३ फेब्रुवारी २०२५ : आगामी महानगरपालिकेची निवडूक लवकरच लागणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षाने कसून तयारी कारायला सुरुवात केली आहे. यातच कॉँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या चर्चेत आले आहेत.रवींद्र धंगेकरांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेट्समुळे ते सध्या चर्चेत आहेत. त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेट्समधील फोटोट त्यांनी गळ्यात भगव उपरण परीधान केल्याच पहायला मिळाल.
त्यामुळे रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार का ? असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. तसेच धंगेकरांच्या मनात नेमक काय चालू आहे. याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जातयात. पण आता यावर शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी आज मध्यमांशी बोलताना विधान केले आहे. उदय सामंत म्हणाले की, मी धंगेकरांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. कालच मी त्यांना पक्षात येण्याच निमंत्रण दिले आहे. असे मंत्री उदय सामंत माध्यमानशी बोलताना म्हणाले आहेत.
काय होता धंगेकरांचा स्टेट्स :
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्टेट्समध्ये गळ्यात भगव उपरण घातलेला एक फोटो ठेवला होता आणि त्या स्टेट्सला तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी…’ हे गाणे ठेवलं होतं. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या स्टेट्सची मोठी चर्चा सगळीकडे रंगली असून रवींद्र धंगेकर हे काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वीच धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या भेटीतून चर्चेला उधाण आलं होत. तेव्हा धंगेकरांना विचारण्यात आले असता ” मी माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.