राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप

नाशिक, २७ मार्च २०२३: ‘मी माफी मागणार नाही, मी सावरकर नाही.’ काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. सावरकरांना आम्ही आमचे आदर्श मानतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलंय. त्यांचं बलिदान हे प्रतीक आहे, त्यामुळं त्यांचा अनादर आम्ही खपवून घेणार नाही. राहुल यांना सल्ला देताना ठाकरे म्हणाले की, त्यांनी सावरकरांचा अपमान करणं टाळावं.

मालेगाव, नाशिक येथील सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाहीच्या रक्षणासाठी महा विकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती, त्यामुळं एकजुटीने काम करणं अत्यंत आवश्यक आहे. महा विकास आघाडी युतीमध्ये शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) यांचा समावेश आहे.

राहुल गांधींना सावरकरांविरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सावरकरांनी अंदमान निकोबार तुरुंगात १४ वर्षे यातना भोगल्या. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचं बलिदान हे देशाचे प्रतीक आहे. हा वेळ वाया घालवला तर लोकशाहीचं अस्तित्वच संपुष्टात येईल, असं ठाकरे म्हणाले. असं झाल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल.

भाजपवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही ते लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की, राहुल गांधींनी सरकारला योग्य प्रश्न विचारला आहे की, अदानींच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कोणाकडे गुंतवले आहेत? मात्र यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. या यात्रेत उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.

लोकसभा सदस्य झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी भाजपच्या आरोपांवर पत्रकार परिषदेत म्हटले होते की, मी सावरकर नाही, मी गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा