उद्धव ठाकरे यांना राजीनामा देणे भोवले, आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

मुंबई ११ मे २०२३ : संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असलेल्या राज्याच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निकाल समोर आला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणे त्यांना भावले आहे.उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार पुन्हा आले असते असे नोंदवत, न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे ते १६ आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद सुरक्षित झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत असताना, सत्ता संघर्षातील घडामोडींमध्ये राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत. सत्ता संघर्षातिल घडामोडींमध्ये तत्कालीन राज्यपाल यांची भूमिका शंकास्पद असल्याचे या निकालात नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा असे आपल्या निकालात म्हटले आहे. आता विधानसभेच्या पटलावर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा