पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला नाही: नाना पटोले

10

मुंबई, १५ जून २०२१: महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पूर्ण पाच वर्ष शिवसेनेकडे राहील का, हा मुद्दा सध्या राजकारणात चर्चेत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती तसेच अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जाईल अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान याबाबत खुद्द नाना पटोले यांनाच विचारलं असता त्यांनी आपली भूमिका मांडली.

नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच

राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि तसं ठरल्याची राज्यात जोरदार चर्चा आहे. पण ,असं काहीच ठरलेलं नसून आघाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद पाच वर्ष शिवसेनेकडेच राहणार असं रोखठोकपणे संजय राऊत सांगत आहेत. नाशिक दौऱ्यात संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला आघाडीत सत्तेचा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरलेला आहे का? त्यावेळेस संबंधित पत्रकाराला करेक्ट करत राऊत म्हणाले की, ‘मी रोखठोकमध्ये सत्तेच्या फॉर्म्युल्याबद्दल लिहीलेलं नाही. तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष राहील. यामध्ये कुठल्याही वाटाघाटी नाहीत. ही कमिटमेंट आहे असं मी म्हटलं आहे. कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसा इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्णकाळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशा प्रकारची कमिटमेंट सुरुवातीपासून झालेली आहे. आणि मला असं वाटतं, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा जाहिरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे’.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा