उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज, देवेंद्र फडणवीसांचा टोला

7

मुंबई, ११ जुलै २०२३ : आत्ता राज्यातील परिस्थिती पाहता, उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मुंबई येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात सत्ताधाऱ्यांना उद्देशून कलंक शब्दप्रयोग केला होता. त्यावरुन सध्या राजकारण तापले आहे. भाजपमधील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शब्दप्रयोगावर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरेंच्या विचारांची कीव येते आहे असे म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विपरीत परिणाम झाला आहे. अशा मानसिक स्थितीत असलेली व्यक्ती काही तरी बोलत असेल तर त्यावर बोलणे योग्य नाही. अशा स्थितीत आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे मला उद्धव ठाकरे माझ्यावर काय बोलले यावर कोणतेही मत मांडायचे नाही, पण सध्या मानसिक स्थिती बरी नसल्याने ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा