१६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह इतर योजनांचं उद्धव ठाकरे आज करणार उद्घाटन

औरंगाबाद, १२ डिसेंबर २०२०: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार मोठ्या योजनांचं उद्घाटन आज करण्यात येणार आहे. यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. गरवारे स्टेडियमवरील भव्य शामियान्यात हा उद्घाटन कार्यक्रम सोहळा रंगणार असून या कार्यक्रमाला फक्त २०० निमंत्रितांना प्रवेश मिळणार आहे.

विशेष म्हणजे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्यातील विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. उध्दव ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री आज १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार महत्त्वांच्या योजनेचं उद्घाटन करणार आहे. त्यामुळं या दौऱ्यात ते काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या कार्यक्रमासाठी २०० निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी गरवारे स्टेडियमवर ७० स्क्रिन लावण्यात आले आहेत. १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचं उद्घाटन, जंगल सफारी पार्कचं आभासी पद्धतीनं उद्घाटन आणि औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ यावेळी उद्धव ठाकरे करणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा