मराठा आरक्षण संदर्भात उद्धव ठाकरे यांची आढावा बैठक वर्षा बंगल्यावर संपन्न

मुंबई, दि. १६ जुलै २०२०: प्रलंबित असलेला मराठा आरक्षण मुद्दा अद्यापही ठोस निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेला नाही. ठाकरे सरकारकडून मराठा आरक्षणाला मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच १६ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्षा या राजकीय निवासस्थानी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

या बैठकीत एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण आदी मंत्री वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. या आधी अशोक चव्हाण आणि खासदार संभाजीराजे यांच्या मध्ये चर्चा झाली होती. अशोक चव्हाण यांनी सांगितले की संभाजी राजे यांच्या सोबत झालेली चर्चा व त्यांनी मांडलेले मुद्दे मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले आहेत.

येत्या २७ जुलै रोजी या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान आपली बाजू पटवून देण्यासाठी ठाकरे सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे व त्यासाठी काय करावे लागेल याबाबत चर्चा या बैठकीत करण्यात आली. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, की मराठा आरक्षण संदर्भात सर्व संस्थांशी व नेत्यांशी अमची योग्य ती चर्चा सुरू आहे. तसेच आमचे वकील देखील यासाठी तयारी करत आहे. त्यामुळे २७ तारखेच्या सुनावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न आमच्याकडून केले जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा