गोल पोस्ट राजकारण उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. १६९ आमदारांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारला मिळाला आहे. . त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले. ४ सदस्य तटस्थ राहिले त्यात नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन केले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ज्यांचा मंत्रिमंडळावर यांनी ज्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी एका बाजूला बसण्याचे आदेश दिले.
हे अधिवेशन आणि मुख्यमंत्र्यांची शपथ नियमबाह्य असल्याचं सांगत मात्र विरोधी पक्ष भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि हंगामी अध्यक्षांवर हल्लाबोल केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करावी लागण्याची प्रक्रिया जरा काळ लांबली. मात्र त्यानंतर आधी आवाजी मतदान आणि नंतर शिरगणतीने मतदान घेण्यात आलं.

error: Content is protected !!
Exit mobile version