मुंबई: थोड्याच वेळापूर्वी अजित पवारांनी आपला राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे वळण आणले आहे. कोर्टाच्या निकालानंतर उद्या बहुमत सादर करण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ सुरु झाली होती. एका बाजूला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बहुमत देण्याचा दावा करत होते तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी आपला राजीनामा सोपवून भाजपलाही धक्का दिला आहे.
या सर्व घडामोडी वर आपली प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी नुकतेच पत्रकारांना सांगितले की, उद्या आम्ही बहुमत सादर करू व उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्याही पक्षासोबत वाटाघाटी होणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
सर्वांना उद्या काय होणार आहे याची उत्सुकता लागून आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या बैठकीतून काय समोर अंतर हेही मोठि उत्सुकतेची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत येत आहे. जर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर उद्या कदाचित भाजपा बहुमत सादर करण्यास असमर्थ ठरू शकेल. भाजपने घेतलेल्या निर्णयाचा हा मोठा पराभव असेल.