मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. आज मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून शहरी भागातील दिग्गज आमदारांना बाजूला सारून ग्रामिण भागातील नव्या चेहर्यांना मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी निमंत्रीत की आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत मोठे धाडसी निर्णय घेतलेत. पक्षातील प्रस्थापितांना दूर करत गावपाड्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्री मंडळात संधी दिलीय.
मंत्री मंडळात शिवसेनेनं ग्रामिण भागातून निवडून येणाऱ्या आमदारांना सर्वाधीक संधी दिलीय. यामध्ये अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. ज्यांनी शिवसेनेला विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर जाहीर पाठिंबा दिला होता. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख म्हणुन ग्रामिण महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सत्तेची भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याची माहीती मिळतेय.