उद्याच बहुमत सिद्ध करा; गुप्त पध्द्तीने मतदान नको

दिल्ली:  महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे आहे.असे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले होते. महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची याचिका दाखल करण्यात आली होती.
या बहुमत चाचणीचे लाइव्ह टेलिकास्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. त्यामळे भाजपला सरकारला ३०तासात बहुमत सिद्ध करायचे आहे.
याशिवाय हंगामी विधानसभा अध्यक्ष कोण होते हे पाहणे गरजेचे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा