“आज के शिवाजी मोदी” या पुस्तकावरून सध्या महाराष्ट्रात चांगलाच वाद चिघळलेल्या दिसत होता.हे प्रकरण थंड होता होता त्यात उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेतली.पण या परिषदेत ते पुस्तकाचा विरोध कमी आणि विरोधकांवर बोचर्या टीकेचे बाण जास्त सोडताना दिसले.
उदयनराजे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाविकासआघाडीवर घणघणाती शब्दाचें वार केले. नेमके प्रकरण काय आणि आपण उदाहरण काय देतोय यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली. “जाणता राजा फक्त शिवाजी महाराज” असे बोलत त्यांनी राष्ट्रवादी ला हिणवले त्यांना जितेंद्र आव्हाड यांनी हात काढले तर काय झाले असे प्रतिउत्तर दिले.पुढे शिवसेनेवर तर उदयनराजेंचा आक्रमकतेचा पवित्रा स्पष्टपणे दिसला त्यांनी “शिवसेना” नाव ठेवले तेव्हा आम्हाला विचारले का ? शिवसेना नाव काढून ठाकरे सेना करा ना असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनां केले. पुढे शिव वड्याचाही प्रश्न विचारला या वर संजय राऊत यांनी उदयनराजेंनी स्वाभिमान सोडून बोलले अशी प्रतिक्रिया दिली तर आजून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.आता ते काय बोलतील ह्या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुढे त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना जगात कोणाशी ही होणार नाही असे सर्व पक्षांना खडे बोल सुनावले खरे
पण या सर्व पत्रकार परिषदेत ते मुळ विषयी कमी आणि विरोधंकांवर केलेल्या हल्ला बोल मुळे,उदयनराजे यांची भाजपची भाषा? असा प्रश्न उपस्थित होतंय.