१६ डिसेंबरपासून नवे नियम लागू करण्याचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI)घेतला आहे. टेलिकॉम कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्स, स्वस्त कॉल आणि इंटरनेट सुविधा आणि फ्री कॉलिंगची सुविधा लवकरच बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. ट्राय याबाबत सध्या विचार करत असून कॉल आणि डेटासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. दरम्यान, मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी लवकरच नवे नियम लागू होणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी केवळ तीन दिवस लागणार आहेत.
ट्रायच्या या नव्या प्रक्रियेत युपीसीची अट घालण्यात आली आहे. यामुळे सर्व्हिस एरियामध्ये तीन दिवसात पोर्ट करावे लागेल तर दुसऱ्या सर्कलमध्ये पोर्ट करण्यासाठी 5 दिवसांची मुदत असेल. यामुळे मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा वेगाने होणार आहे.