उजनी धरण पातळीत तेरा दिवसात ६.१८ टक्क्याने वाढ

इंदापूर, दि. २६ जून २०२० : पुणे ,सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या व पाणी साठ्यात क्रमांक एकला असलेल्या उजनी धरण साठ्यात गेल्या तेरा दिवसात ६.१८ टक्क्याने वाढ झाली आहे.

उन्हाळ्यात ज्यावेळी सोलापूर जिल्ह्यास पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते त्यावेळी उजनी धरण वजा मध्ये गेले होते .१३ जून रोजी पाणी बंद करण्यात आले.

त्यावेळी उजनी धरणात उपयुक्त साठा वजा ९.६३ टीएमसी होता तर उपयुक्त पाण्याची एकूण टक्केवारी वजा १७.९७ एवढी होती. मागील काही दिवसात भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाला आहे.

पुणे परिसर तसेच भीमा नदीच्या खोऱ्यात पर्जन्यामुळे उजनीत दौंड जवळून पाणी मिसळू लागले आहे उजनी धरणात दौंड जवळून पाण्याची आवक होत असून यामुळे गेल्या काही दिवसात उजनी धरणात ६.१८ टक्क्यांनी पाणी साठा वाढला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा