माढा, १२ ऑक्टोबर २०२०: उजनी धरण व्यवस्थापन विभागाची चौकशी करण्यात यावी यासाठी सोमवारी एकदिवशीय उपोषण शिवसेनेचे माढा विधानसभा नेते संजय कोकाटे, भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, रयतक्रांती सोलापूर जिल्हा प्रमुख प्रा. सुहास पाटील, शिवसेना तालुका प्रमुख मधुकर देशमुख, टेंभुर्णी शहरध्यक्ष सुरेश लोंढे व उपोषणकर्ते धनाजी कारंडे यांनी कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांचेकडून योग्य ती चौकशी करण्यात येईल असे लेखी आश्वासन घेऊन हे उपोषण मागे घेण्यात आले.
माढा तालुक्यातील भीमानगर येथे उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे ऑफिस असून या विभागामार्फत वेगवेगळ्या कामांसाठी ऑनलाईन टेंडर निघत असते. परंतु तीन लाखांच्या आतील कामाचे टेंडर निघत नसून हे काम उजनी धरण व्यवस्थापन विभागाला म्हणजेच कार्यकारी अभियंता यांना देण्याचा अधिकार असून या कामात अनियमितता असून सतत मर्जीतल्या ठेकेदारांना ही कामे देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असल्याचे श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्था भिमानगरचे अध्यक्ष धनाजी कारंडे यांनी आपल्या निवेदनात केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा १२ ऑक्टोबर रोजी कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला मातंग ऐकता आंदोलन माढा तालुका अध्यक्ष अनिल गवळी व उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पाटींबा दिला आहे.
यावेळी उपोषणकर्ते धनाजी कारंडे, हनुमंत माने, सतिश कदम, प्रशांत पाटील, संतोष पाटील, सचिन नलवडे, बारीक जाधव, दत्तात्रय लोंढे, सुधीर पाडुळे, दत्ता पाटील प्रशांत जाधव, नारायण गायकवाड आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील