उजनीत येतोय दौंडमधून ४५५५ क्यूसेक विसर्ग

45

उजनी, दि. १० जुलै २०२०: उजनी जलाशय परिसरात गुरुवारी जोरदार पावसामुळे दौंड मधून उजनीत ४५५५ क्यूसेकनी हेवा येत होता. गेल्या महिन्यात १८ जुलैला उजनीधरण वजा २२ टक्के होते. ते आज वजा ४.९० टक्के झाले.

गेली पंधरा दिवस झाले उजनीत कमीजास्त प्रमाणात दौंडमधून पाण्याची आवक सुरूच राहिली गुरूवारच्या पावसाने त्यात वाढ झाली. असाच विसर्ग उजनीत येत राहिला तर पुढील आठवड्यात उजनी पाणी साठा मायनस मधून प्लसमधे येईल. यामुळे चालू वर्षी धरण लवकरच भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी वर्गामधे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

गेली सात ते आठ वर्षात यंदा प्रथमच मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्यामुळे विहिरी, बोअर यांची पाण्याची पातळी वाढली आहे.व खरीपाची पिके चांगलीच बाळसे धरू आगली आहेत.

गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणी पातळी वजा वजा ४८.२१ टक्के होती. चालूवर्षी पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने उजनीचा पाणी साठा मुबलक प्रमाणात होता. त्यातच गुरुवारी जलाशयावर सुमारे दोन ते अडीच तास पाऊस पडत होता.या पावसाची नोंद ५९ मीलीमीटर झाली.

उजनीची सद्यस्थिती

एकूण पाणी साठा ४९०.६४० मीटर
एकूण पाणी साठा १७२७.१९ दलघमी
उपयुक्त पाणी साठा वजा ७५.६२ दलघमी
टक्केवारी वजा ४.९० टक्के

पाण्याची आवक

दौंडमधून येणारा विसर्ग ४५५५ क्यूसेक

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील