पुणे, २९ मे २०२३: राज्याच्या काही भागातील तापमान तीन ते चार अंशांनी घटले असले तरी बहुतांश भागात येत्या गुरुवारपर्यंत उकाडा कायम राहणार आहे. सोबत हलका ते मध्यम पाऊसही पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान मान्सून अधाप निकोबार बेटावरच अडकला आहे. तो फार पुढे सरकलेला नाही. उत्तर भारतात नवा पश्चिमी चक्रवात रविवारी सक्रिय झाला. त्यामुळे काही भागात पाऊस सुरू झाला आहे.
मान्सून निकोबार बेटावर पोहोचल्याने दक्षिणी किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतात पाऊस सुरू आहे. राजस्थानात रविवारी बिकानेर येथे मुसळधार पाऊस झाला. पोखरण, जैसलमेर भागात धुळीचे वादळ सक्रिय झाले. त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे. तर विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवार आणि गुरुवारी विदर्भात जोरदार पाऊस पडेल, मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यातील तापमान चंद्रपूर ४३, यवतमाळ ४१.६, नागपूर ४१.१, बुलडाणा ३८.२, अमरावती ४०, जळगाव ४१, नाशिक ३५, पुणे ३६.६, कोल्हापूर ३४.४, महाबळेश्वर ३०, सांगली ३७.३, छत्रपती संभाजीनगर ३८.४ एवढं तापमान राज्यात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर