पुणे, दि. ११ जुलै २०२०: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून युक्रांदने पुणे येथील लॉकडाऊनला तीव्र नापंसती दर्शवली आहे.
यावेळी आपले निवेदन मांडत असताना युक्रांद ने ३ महिन्याच्या काळातील लॉकडाऊन बद्दल समाजाची परिस्थिती मांडतांना सांगितले, गेले ११३ दिवस आपण लॉकडाऊनमध्ये बंदिस्त आहोत, सुरवातीच्या काळात हे कोरोना नावाचे संकट आणि त्यातुन होणारा कोवीड-१९ हा आजार या दोन्हीही गोष्टी आपल्यासाठी नवीन होत्या म्हणून त्याच्याशी सामना करण्यासाठी लॉकडाऊन नावाच अस्त्र आपण शोधलं असा अविभाव आपण आणलात, पण त्याचे सर्व परिणाम आपल्यासमोर आहेत, म्हणजेच लॉकडाऊन हे निष्फळ ठरले आहे.
आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन हा पर्याय युवक क्रांती दलाला योग्य वाटत नाही. सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाची सोय न करता लॉकडाऊनच्या निर्णयाला तीव्र विरोध आहे.
दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोरोना विषाणुचे संक्रमण जलद गतीने होत आहे हे आपण सारेच जाणतो. यावर उपाय म्हणुन पुणे परिसरातील हॉटेल (लॉजींग), सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविदयालये, विश्रामगृहे, मंगलकार्यालये, तसेच बांधुन तयार असलेल्या रिकाम्या इमारती, प्रशासनाने ताब्यात घेऊन दाट लोकवस्ती असलेल्या भागातील लोकसंख्या त्वरीत तिकडे हलवावी अशा प्रकारच्या सुचना यापुर्वी केल्या होत्या. जेणेकरुन विषाणुचे संक्रमण होण्यापासुन वाचता येईल.
पुण्याचा पालकमंत्रीनीं ( अजितदादा पवार ) घेतलेल्या १० दिवसीय लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा जगण्या-मरण्याचे प्रश्न निर्माण होतील. सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्याचे प्रमाण वाढु शकेल असे आम्हास वाटते. तसेच बाहेर गावाहुन नोकरीसाठी परत आलेल्या लोकांचे हाल होतील. लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर सरकार ठामच असेल तर नागरिकांच्या जिवनावश्यक वस्तु पुरविण्याची जबाबदारी सुध्दा सरकारचीच आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार न करता केला जाणारा लॉकडाऊन कधीच यशस्वी होऊ शकत नाही याची प्रचिती आपण घेतली आहे, अशी भीती ही ह्यावेळेस व्यक्त केली.
मुलभूत सुविधांचे संपूर्ण नियोजन करुन केल्या गेलेल्या लॉकडाऊनला युवक क्रांती दलाचा सहकार्य राहील. त्यासाठी युवक क्रांती दल स्वयंसेवक कामसुध्दा करु शकतील, अशी तयारी आज
युवक क्रांती दल ने दाखवली आहे.
लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुरनविचार करावी अशी सरकार दरबारी सुचना करतो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये जांबुवंत मनोहर राज्यसंघटक, सचिन पांडुळे अध्यक्ष, पुणे शहर सुदर्शन चखाले कार्यवाह, पुणे शहर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे